इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय संघाने दुस-या सामन्यात झिम्बाब्वेचा रविवारी दारुण पराभव करत पहिल्या सामन्याच्या पराभवाचे उ्ट्टे काढले. पाच दिवसाच्या टी -२० मालिकेत भारतीय संघाने २० षटकात २ गडी गमवून २३४ धावा केल्या आणि विजयासाठी २३५ धावांचे आव्हान दिेले. मात्र झिम्बाब्वेचा संघ १३४ धावा करू शकला. या पाच दिवसाच्या मालिकेत १-१ ने बरोबरी झाली आहे.
या सामन्यात डावखुरा अभिषेक शर्माने ४७ चेंडूत ८ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने १०० धावा केल्या. तर ऋतुराज गायकवाड आणि रिंकु सिंह यांनी दमदार खेळीचं प्रदर्शन केलं. ऋतुराज गायकवाडने ४७ चेंडूत नाबाद ७७, तर रिंकु सिंहने २२ चेंडूत नाबाद ४८ धावा केल्या.
या सामन्यात मुकेश कुमार आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. तर रवि बिष्णोईने २ आणि वॉशिंग्टन सुंदरने एक गडी बाद केले.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा,ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, रियान पराग, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार
झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): वेस्ली मधेवेरे, इनोसंट कैया, ब्रायन बेनेट, सिकंदर रझा (कर्णधार), डिओन मायर्स, जोनाथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदांडे (डब्ल्यू), वेलिंग्टन मसाकादझा, ल्यूक जोंगवे, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा