इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी मुख्यमंत्री डॉ मोहन यादव आणि राज्यातले इतर मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत मध्य प्रदेशातील इंदूर येथे “एक पेड़ माँ के नाम” या वृक्षारोपण मोहिमेत भाग घेतला.
कार्यक्रमाला संबोधित करताना भूपेंद्र यादव म्हणाले की, “पंतप्रधानांनी पर्यावरण रक्षणासाठी ‘एक पेड़ माँ के नाम’ हे अभियान सुरू केले आणि त्यांनी प्रत्येक नागरिकाला या मोहिमेचा भाग बनण्याचे आवाहन केले.” ते पुढे म्हणाले की, “संपूर्ण देशात 140 कोटी वृक्ष लागवडीची एक भव्य मोहीम सुरू आहे. आपल्याला जीवन देणाऱ्या आईचा आदर करणे आणि निसर्ग मातेचा आदर राखून हरित धरती बनवण्याचा संकल्प पूर्ण करणे हे आपले कर्तव्य आहे.” यादव यांनी मध्य प्रदेशातील वृक्षारोपण उपक्रमाचे कौतुक केले. स्वच्छ इंदूरसह हरित इंदूर करण्यासाठी इंदूरवासीयांची मोहीम कौतुकास्पद असल्याचेही ते म्हणाले.
कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव म्हणाले की, “प्राचीन काळापासून इंदूर आणि उज्जैनचे पर्यावरणाच्या महत्त्वाच्या दृष्टीने विशेष स्थान आहे. स्वच्छ शहराबरोबरच हरित शहर होण्यात इंदूर निश्चितपणे प्रथम क्रमांकावर येईल,”असे ते म्हणाले.