इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
परभणी – छगन भुजबळ आतापर्यंत ओबीसी मतदानाची भीती दाखवत होता. त्यांना आता कळलं मराठा मत काय आहे. ते मला गावठी समजत होते. गावठ्याने कसा हिसका दाखवला. आता तर येवल्याचे लोक सागंतात भुजबळांना पाडणार असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांवर पुन्हा टीका केली. यावेळी ते म्हणाले, आज परभणीची रॅली बघून सरकार १३ तारखेला आरक्षण देईल जर आरक्षण दिले नाही तर २८८ गेले समजा, आम्ही २८८ पाडून नंतर मुंबईला जाऊ असे सांगत त्यांनी सरकारला लक्ष केले.
मराठवाड्यातील परभणी येथील संवाद रॅलीचे शहरात अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. या वेळी लाखो मराठा बांधव उपस्थित होते. एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे यासह सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी संवाद रॅली काढली. मनोज जरांगे शहरात येण्याअगोदरच रस्ते ब्लॅाक झाले होते.
यावेळी जरांगे पाटील म्हणाले सर्व ओबीसी नेते एक झाले आहे. सर्व पक्षांच्या मराठा नेत्यांनी एकत्र यावे व आरक्षणसाठी प्रयत्न करावे. मराठा समाजाचा नाराजीचा रोष सरकारला परवडणारा नाही. यावेळी त्यांनी फडणवीसांनी सांगावे आम्ही काय गैरसमज पसवला असा प्रश्नही केला. तर गावखेड्यात मराठा – ओबीसी वाद नको असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी त्यांनी मराठ्यांना कमजोर समजू नका, आमचा जोर कुठेच कमी झालेला नाही असेही त्यांनी सांगितले. आम्हाला आरक्षण द्या, आमच्यावर अन्याय करू नका, सांगताना आम्ही ५० ते ५५ टक्के आहोत, असे सांगताना आम्हाला कायदा व सुव्यवस्था बिघडू द्यायची नाही. आम्ही संयम ठेवतो; परंतु त्यांचा कडेलोट होऊ देऊ नका, असा इशारा त्यांनी दिला.