मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी मालेगाव महानगरपालिकेचे बिट मुकादम मनोहर बाबुलाल ढिवरे हे पाच हजार रुपयाची लाच स्विकारतांना रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात सापडले आहे.
याबाबत एसीबीने दिलेली माहीती अशी की, तक्रारदार यांनी जम जम प्राथमिक व जन्नत माध्यमिक विद्यालय, मालेगाव येथील अनधिकृत बांधकामाबाबत कायदेशीर कारवाईसाठी मालेगाव महानगरपालिका येथे अर्ज दिला होता. त्या अर्जानुसार प्रस्ताव वरिष्ठांना सादर करण्यासाठी व अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी मनोहर बाबुलाल ढिवरे, बिट मुकादम, मालेगाव महानगरपालिका मालेगाव यांनी तक्रारदार यांचेकडे ०२/११/२०२३ रोजी १० हजार रुपयाची लाचेची मागणी करून, तडजोडीअंती पाच हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य करून ०२/११/२०२३ रोजी
सदर लाचेची रक्कम रुपये पाच हजार पंच साक्षीदार यांचे समक्ष स्वीकारल्याने रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*लाचेचा यशस्वी सापळा कारवाई
*युनिट – ला.प्र.वि. नाशिक
*तक्रारदार- पुरुष, ४१ वर्ष.
*आलोसे – मनोहर बाबुलाल ढिवरे , वय- ४५वर्ष, व्यवसाय – नोकरी , बिट मुकादम, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव, जिल्हा नाशिक.
*लाचेची मागणी- १०,०००/- रुपये २/११/२०२३
*लाच स्वीकारली – ५,०००/- रुपये ०२/११/२०२३
लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांनी जम जम प्राथमिक व जन्नत माध्यमिक विद्यालय, मालेगाव येथील अनधिकृत बांधकामाबाबत कायदेशीर कारवाईसाठी मालेगाव महानगरपालिका येथे अर्ज दिला होता. त्या अर्जानुसार प्रस्ताव वरिष्ठांना सादर करण्यासाठी व अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी आलोसे मनोहर बाबुलाल ढिवरे, बिट मुकादम, मालेगाव महानगरपालिका मालेगाव यांनी तक्रारदार यांचेकडे दिनांक ०२/११/२०२३ रोजी १०,०००/- रु. लाचेची मागणी करून, तडजोडीअंती ५,०००/- स्वीकारण्याचे मान्य करून दि. ०२/११/२०२३ रोजी
सदर लाचेची रक्कम रुपये ५,०००/-पंच साक्षीदार यांचे समक्ष स्वीकारल्याने रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू आहे.
*आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी :- आयुक्त, मालेगाव महानगरपालिका मालेगाव,जिल्हा नाशिक.
*सापळा अधिकारी – नाना सूर्यवंशी , पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
*सापळा पथक –
पो. हवा. सचिन गोसावी.
पो. हवा. शरद हेबांडे,
पो. ना. विलास निकम.
चा. पो..ना. परशुराम जाधव.