इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुसळधार पावसामुळे मुंबई – मनमाड रेल्वे वाहतूक विस्कळीत झाला आहे. इगतपुरी ते कसारा घाटात दरड कोसळल्याचे झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे काही गाड्या दुस-या मार्गाने वळवल्या. तर काही गाड्या या नाशिक, इगतपुरी येथे थांबवण्यात आल्या आहे.
कालच पंचवटी एकसप्रेसची बोगी रेल्वे इंजिनपासून वेगळी झाल्याची घटना घडली आहे. त्यानंतर आज पावसामुळे रेल्वे विस्कळीत झाली आहे.
वाशिंद व खडवली स्थानकांदरम्यान मुसळधार पाऊस, दरड कोसळणे, रेल्वे मार्गाखालील खडीचा भराव वाहून जाण्याच्या घटनां घडल्या आहे.
या घटनेमुळे मुंबईकडे जाणारी राजधानी एक्स्प्रेस नाशिकरोड स्थानकात थांबविण्यात आली. मुंबईकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या ११ रेल्वेगाड्यांची वाहतूक पुणे, दौंडमार्गे वळविण्यात आली आहे. काही रेल्वेगाड्या वेगवेगळ्या स्थानकांवर थांबवून माघारी वळवण्यात आल्या