इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिकमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. सिडकोतील जेष्ठ नेते तथा माजी नगरसेवक नाना महाले यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शरद पवार गटात प्रवेश केला. बारामती येथे गोविंदबागेत हा प्रवेश सोहळा झाला.
लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार गटाची ताकद ग्रामीण भागातील वाढली आहे. त्यानंतर आता शहरातही शरद पवार गटाला बळ मिळत आहे. या प्रवेश सोहळ्यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. नाना महालेहे जेष्ठ नेते आहेत.
या नेत्यांचा प्रवेश
माजी नगरसेवक दत्ता पाटील, नाशिक पश्चिम विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब गिते, नवीन सिडको अध्यक्ष मकरंद सोमवंशी, दादा कापडणीस, नवीन नाशिक कार्याध्यक्ष सुनील आहिरे, नाशिक पश्चिम उपाध्यक्ष अक्षय़ परदेशी, राहुल कमनकर, ज्ञानेश्वर महाजन, सागर मोटकरी, अरुण निकम, राजेश भोसले, राजू पवार यांच्या सिडको, नवीन नाशिकच्या शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला.