धुळे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नाव लावून दिल्याच्या मोबदल्यात दोन हजाराची लाच स्विकारतांना शिरपूर तालुक्यातील जवखेडा मंडळाचे मंडळ अधिकारी मुकेश श्रीकांत भावसार हे लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात अडकले.
या घटनेबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचे वडिलांच्या नावे असलेल्या शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर तक्रारदार व त्यांच्या बहिणीचे नाव लावून दिल्याच्या मोबदल्यात मंडळ अधिकारी यांनी तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपयाची लाचेची मागणी करून सदर लाच रक्कम पंचासमक्ष स्वीकारल्याने त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
*युनिट – धुळे
*तक्रारदार- पुरुष, वय 40 वर्ष,
*आलोसे – मुकेश श्रीकांत भावसार, वय 42 वर्ष, पद – मंडळ अधिकारी, (वर्ग 3) जवखेडा मंडळ,
ता. शिरपूर जिल्हा धुळे रा. उत्सव मॉल मागे, शिरपूर.
लाचेची मागणी- 2,000/- दि. 01/11/2023.
लाच स्विकारली – 2,000/- 01/11/2023
*लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांचे वडिलांच्या नावे असलेल्या शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर तक्रारदार व त्यांच्या बहिणीचे नाव लावून दिल्याच्या मोबदल्यात यातील आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडून रुपये 2,000/- लाचेची मागणी करून सदर लाच रक्कम पंचासमक्ष स्वीकारल्याने त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
*सापळा अधिकारी:-
अभिषेक पाटील,
पोलीस उपअधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे.
*सापळा पथक* –
पो नि हेमंत बेंडाळे, पोहवा राजन कदम, पोना संतोष पावरा, चालक पोहवा सुधीर मोरे, सर्व लाप्रवि धुळे.