बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

महायुतीच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अजित पवार यांनी केले हे आवाहन…

by India Darpan
जुलै 7, 2024 | 12:16 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
GR0rf6TaYAAXh3P

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महायुतीच्या सरकारच्या काळात अनेक लोकहिताचे निर्णय घेतले आणि त्यांची अंमलबजावणी केली. आमच्या सरकारने कायमच महाराष्ट्रातल्या जनतेच्या हिताच्या निर्णयांना पहिलं प्राधान्य दिलं आहे. येत्या काळात देखील राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही काम करत राहणार आहोत. महायुतीच्या सरकारची दमदार कामगिरी जनतेपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आता तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यावर असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

आज महायुतीतील राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईतील षन्मुखानंद सभागृहात पार पडली. या बैठकीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस आणि महायुतीचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी आज अजित पवार यांनी संवाद साधला.

यावेळी ते म्हणाले की, विरोधकांनी चुकीचा नॅरेटिव्ह पसरवल्याने लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. संविधान बदलले जाणार असल्याच्या चुकीच्या नॅरेटिव्हचा निवडणुकीत फटका बसला. पण आता विरोधकांचा हा नॅरेटिव्ह चुकीचा असल्याचं सिद्ध झालंय. आता मतदारांना कळतंय की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संविधानाला मोठ्या आदराचं स्थान मिळवून देण्याचं काम केलं.

महायुतीच्या सरकारने अतिशय चांगला अर्थसंकल्प सादर केलाय. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आता तो जनतेपर्यंत पोहचविण्याचं काम हाती घ्यायला हवं. अर्थसंकल्पामुळे विरोधकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलंय. त्यामुळे अर्थसंकल्पाबद्दल खोट्या-नाट्या गोष्टी पसरवल्या जाताहेत. लाडकी बहीण योजना- अन्नपूर्णा योजना यशस्वी होऊ नये यासाठी विरोधक प्रयत्न करताहेत. मात्र विरोधकांच्या नकारात्मक प्रचाराकडे लक्ष न देता आपण सकारात्मक राहायचं. विकासाचा मुद्दा घेऊन पुढे जायचं.

अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेल्या योजना निवडणुकीपुरत्या नाहीत, हे जनतेपर्यंत पोहोचवायला हवं. आजपासून ते विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत सरकारने केलेली कामं आणि अर्थसंकल्पातील योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. फक्त विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जायचंय. मला महायुतीच्या कार्यकर्त्यांना आवाहन करायचंय की लोकांना योजनांचे फॉर्म भरण्यासाठी आणि शक्य ती सर्व मदत करा. महायुतीतील घटक पक्षाचे कार्यालय लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी आहे, हा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करा.

मला कार्यकर्त्यांना अजून एक गोष्ट सांगायची आहे की विरोधी पक्षांनी कितीही नकारात्मक प्रचार केला, तरी आपला प्रचार सकारात्मक असेल याची काळजी घ्या. मात्र विरोधकांकडून अपप्रचार केला जात असेल, तर त्याचा वेळीच प्रतिवाद करा. तीन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन निवडणुकीला जाऊया आणि पुन्हा महायुतीचं सरकार आणण्यासाठी ताकतीने लढूयात.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भारतातील वाहन उद्योगातील उलाढाल ७ लाख कोटींवरून २० लाख कोटींवर…

Next Post

एकजुटीने लढुया आणि एकजुटीने जिंकुया’…महायुतीच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

India Darpan

Next Post
GR0rpbHbgAA9oEq

एकजुटीने लढुया आणि एकजुटीने जिंकुया’…महायुतीच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011