इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मराठवाड्यातील पहिल्याच संवाद रॅलीत जरांगे पाटील यांचे हिंगोली शहरात अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. या वेळी लाखो मराठा बांधव उपस्थित होते. एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे यासह सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी संवाद रॅली काढली. आरोग्य विभागाची १६ पथके तैनात करण्यात आली होती.
दरम्यान, दुपारी एक वाजण्याच्या सुमारास जरांगे पाटील यांचे हिंगोली शहरालगत बळसोंड येथे आगमन होताच जल्लोष करण्यात आला. शिवनेरी चौकात दोन क्रेनच्या मदतीने सुमारे दोनशे क्विंटल वजनाच्या पुष्पहाराने त्यांचे स्वागत करण्यात आले. जेसीबीच्या मदतीने पुष्पवृष्टी करण्यात आली. या वेळी लाखेा मराठा बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘एक मराठा लाख मराठा’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता.
जरांगे पाटील म्हणाले, की सर्व ओबीसी नेते एक झाले असून ते मराठ्यांना त्रास देत आहे. कुणी काय बोलायचे हे सर्वांना सांगितले गेले आहे. छगन भुजबळ यांना दुसरे काही काम नसून ते मराठा समाजाच्या विरोधात वातावरण तयार करीत आहेत; पण संयम सुटू देऊ नका. पुन्हा पुन्हा आमच्यावर अन्याय केला, तर मात्र घरादारातील मराठा समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. मराठा समाजाचा नाराजीचा रोष सरकारला परवडणारा नाही.
१३ जुलैपर्यंतची मुदत
जरांगे यांची शांतता जनजागृती रॅलीची सुरुवात आजपासून सुरू झाली आहे. त्यात मराठा समाज मोठ्या प्रमाणात झाले होते. त्यांनी सरकारला मराठा आरक्षणाबाबत १३ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे विधानसभेत २८८ उमेदवार उभे करायचे की पाडायचे? हे १३ तारखेनंतर ठरवणार असल्याचे त्यांनी जरांगे यांनी म्हटले.