इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मनमाड – मुंबई पंचवटी एक्सप्रेस ही कसारा स्टेशन जवळ येताच या एक्सप्रेसची कपलिंग तुटल्याने इंजिन व एक बोगी पुढे मुंबईच्या दिशेने निघून गेले. काही अंतरावर जावून इंजिन व एक डब्बा थांबल्यामुळे अनर्थ टळला.
मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेसने कसारा स्टेशन सोडल्यानंतर काही अंतरावर एक्सप्रेसचा इंजिन पासून एक डब्बा पुढे निघून गेला. ही गोष्ट लक्षात येताच तातडीने रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यानंतर इंजिन पुन्हा मागे घेण्यात आल्यावर कपलिंग बसवण्यात येऊन गाडी पुढे कल्याणच्या दिशेने रवाना झाली.