इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शिवसेना शिंदे गटाचे खासदार रविंद्र वायकर यांना जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट दिली आहे. मुंबई महापालिकेने गैरसमजातून गुन्हा दाखल केल्याचे मुंबई पोलिसांनी सांगत वायकरांवरील सर्व गुन्हे मागे घेतले.
वायकर यांच्यावर मुंबई महापालिकेच्या जागेवर ५०० कोटींच्या ५ स्टार हॉटेलचं बांधकाम व मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्टचा आणि सुप्रिमो बँक्वेटच्या नावाने शेकडो कोटींच्या घोटाळा केल्याचा आरोप होता. याप्रकरणी रविंद्र वायकर त्यांच्या पत्नी मनिषा आणि त्यांचे भागीदार आसू नेहलानी, राज लालचंदानी, प्रिथपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरूण दुबे यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी रविंद्र जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी EOW कडून कोर्टात सी समरी रिपोर्ट सादर करण्यात आला. यानंतर आता मुंबई महापालिकेने गैरसमजातून हा गुन्हा दाखल केल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.