इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक – कारडा कन्स्ट्रक्शनचे मुख्य संचालक नरेश कारडा यांचे बंधू मनोहर जगूमल कारडा यांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. गुरुवारी दुपारी त्यांनी देवळालीच्या रेल्वे गेट जवळ आत्महत्या केली. मुबंईकडे जाणाऱ्या मालगाडी समोर ही आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
नरेश कारडा यांच्या विरुध्द तीन दिवसापूर्वीच फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर त्यांना मुंबई नाका पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना ५ नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. त्यानंतर भावाने ही आत्महत्या केली आहे.
दरम्यान आत्महत्या घटनेचा अधिक तपास लोहमार्ग ठाण्याचे प्रभारी निरीक्षक महेश कुलकर्णी हे करत आहे.