इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांनी हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. या कुटुंबीयांना राहुल यांनी मदतीचा हात देण्याची ग्वाही दिली.
राहुल गांधी शुक्रवारी सकाळी पिलखाना गावात मंजू देवी यांच्या घरी गेले. त्यांनी मंजू देवी यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. हाथरसच्या घटनेत मंजू देवी आणि त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. त्यांनी कुटुंबीयांकडून अपघाताची माहिती घेतली. पीडित कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन राहुल यांनी दिले. अलीगडमधील हाथरस दुर्घटनेतील तीन कुटुंबांना भेटल्यानंतर त्यांनी हाथरसमधील त्यांनी एका उद्यानात हाथरस दुर्घटनेतील चार बळींच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
पिलखाना येथील मंजू देवी यांची मुलगी म्हणाली, की राहुल यांनी पक्षाचे लोक मदत करतील. अजिबात काळजी करू नका, असे आश्वस्त केले. आता हाथरस पीडित आमच्या कुटुंबाचे सदस्य आहेत. शुक्रवारी पहाटे पावणेसहा वाजता राहुल दिल्लीहून निघाले, विरोधी पक्षनेते झाल्यानंतरचा त्यांचा हा उत्तर प्रदेशचा पहिलाच दौरा आहे.