बुधवार, ऑगस्ट 27, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

१०८ रुग्णवाहिका सेवेमुळे १० वर्षात मिळाला १ कोटी रूग्णांना लाभ

by Gautam Sancheti
जुलै 5, 2024 | 11:25 pm
in संमिश्र वार्ता
0
aroghya vibhag

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत ‘डायल 108’ ही रूग्णवाहिका सेवा अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या या सेवेने राज्यातील नागरिकांची आरोग्य सेवा करीत तब्बल 10 वर्ष पूर्ण केले आहे. या 10 वर्षाच्या कालावधीत 108 रूग्ण्वाहिकेची सेवा रूग्णांना जीवनदान देणारी ठरली आहे. अशा या संजीवनी देणाऱ्या रूग्णवाहिका सेवेने राज्यात 1 कोटी 3 हजार 446 रूग्णांची विनामूल्य आरोग्य सेवा केली आहे.

कुणी आजारी असेल, अपघात झाला असेल किंवा वैद्यकीय सेवेची मदत असेल तर 108 रूग्णवाहिका सेवेसाठी तत्पर असते. आपत्कालीन आरोग्य सेवांसाठी ‘एक-शून्य-आठ’ हा विनामूल्य दूरध्वनी क्रमांक आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, सार्वजनिक आरोग्य विभाग व भारत विकास ग्रुपच्या (बीव्हीजी इंडिया) संयुक्त विद्यमाने ही सेवा अव्याहतपणे राज्यात ठिकठिकाणी चालविण्यात येत आहे. महाराष्ट्रात या सेवेची सुरूवात जानेवारी 2014 मध्ये झाली. राज्यात सध्या 937 रूग्णवाहिका असून सर्व रूग्णवाहिकेत पल्स ऑक्स‍िमीटर, मेडीकल ऑक्सिजन यंत्रणा सज्ज आहे. ही देशातील अविरत 24 तास डॉक्टर व अत्यावश्यक वैद्यकीय सुविधेसह असणारी एकमेव यंत्रणा आहे. राज्यात 108 रूग्णवाहिकेमध्ये 40 हजार 213 प्रसुती करण्यात येऊन त्यांना सुखरूप सोडण्यात आले आहे. तसेच 4 हजार 34 रूग्णांना कृत्रिम श्वासोच्छवास (व्हेंटीलेटर) ची सुविधा देण्यात येऊन त्यांचे प्राण वाचविण्यात आले आहे.

राज्यात कोणत्याही ठिकाणावरून मोबाईल अथवा दूरध्वनीवरून 108 क्रमांक डायल करताच वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रूग्णांना विनामूल्य आणि वेळेत रूग्णवाहिका सेवा देण्यात येते. सेवा सुरू झाली तेव्हापासून, जून 2024 पर्यंत अपघाती घटनांमध्ये रूग्णवाहिकेमधून 5 लाख 22 हजार 682 रूग्णांना उपचारासाठी रूग्णालयात पोहचविण्यात आले आहे. तसेच आगीच्या घटनांमध्ये 29 हजार 253, हृदयरोगमध्ये 75 हजार 593, उंचावरून पडून जखमी झालेल्या 1 लाख 58 हजार 684, विषबाधा प्रकरणी 2 लाख 32 हजार 426, प्रसुतीवेळी 16 लाख 56 हजार 94, शॉक किंवा वीज पडून जखमी या घटनांमध्ये 6 हजार 949 रूग्णांना सेवा देण्यात आली आहे. अशा प्रकारे राज्यात 1 कोटी 3 हजार 446 रूग्णांना आरोग्य सेवा 108 च्या माध्यमातून मिळाली आहे. महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा या नावाने असलेल्या 108 ही रूग्णवाहिका सेवा सुरू आहे.

याव्यतिरिक्त राज्यात नाशिक येथील महाकुंभमेळा कालावधीत 1 लाख 7 हजार 200 रूग्णांना सेवा दिली. महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या पंढरपूरच्या वारीमध्ये 2 लाख 89 हजार 646 आणि गणपती उत्सवात 4 हजार 684 रूग्णांना 108 ने सेवा दिली आहे. या सेवेमध्ये सुधारणा करण्यासाठी किंवा सेवेच्या समाधानाबाबत नागरिकांचा प्रतिसाद (फिडबॅक) देखील घेण्यात येतो. राज्यात सेवेबद्दल 6 लाख 74 हजार 542 प्रतिसाद प्राप्त झाले आहे. यामध्ये 81 हजार 155 एकदम उत्तम, 5 लाख 70 हजार 594 उत्तम आणि 22 हजार 793 चांगला प्रकारातील आहे.

राज्यात 108 रूग्ण्वाहिका सेवा संजीवनी आहे. गरीब रुग्णांना या सेवेमुळे वेळेत उपचार मिळण्यासाठी मोलाची मदत झाली आहे. त्यामुळे त्यांना संजीवनीच मिळाली आहे. ही सेवा कोरोना काळात जीवनदायी ठरली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

देशात यंदा कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत २७ टक्के वाढ…केंद्र सरकारने दिली ही माहिती

Next Post

आता राज्यात नव्याने १० हजार गावांमध्ये हवामान केंद्राची उभारणी…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

भूमित्र या चॅटबॉट सेवेचे उद्घाटन 3
संमिश्र वार्ता

महसूल विभागाने ‘महाभूमी’ संकेतस्थळावर ‘भूमित्र’ या चॅटबॉट सेवेची केली सुरुवात

ऑगस्ट 27, 2025
Milind Kadam M4B
संमिश्र वार्ता

मुंबई येथून रत्नागिरी व सिंधुदुर्गसाठी प्रवासी जलवाहतूक सेवा…इतक्या तासाचा असेल प्रवास

ऑगस्ट 27, 2025
Sadan Ganesh 1 11 913x420 1
महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत महाराष्ट्र सदनात गणेशोत्सवाचा जल्लोष; आज ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठा

ऑगस्ट 27, 2025
ajit pawar e1706197298508 1024x770 1
महत्त्वाच्या बातम्या

लंडनमधील ‘महाराष्ट्र भवन’ साठी ५ कोटींचा निधी….उपमुख्यमंत्री अजित पवार

ऑगस्ट 27, 2025
ganeshotsav 1 e1738348574343
मुख्य बातमी

यंदा बाप्पा वाजत गाजत येणार… अशी करा श्रीगणेशाची स्थापना… असा आहे मुहूर्त…

ऑगस्ट 27, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना जुने मित्र भेटेल, जाणून घ्या, बुधवार, २७ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 26, 2025
IMG 20250826 WA0402
स्थानिक बातम्या

नाशिक जिल्हा परिषद विकास निर्देशांकात राज्यात प्रथम…मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते गौरव

ऑगस्ट 26, 2025
Untitled 44
संमिश्र वार्ता

३० महिला शेतकऱ्यांनी उच्च दर्जाची हिरवी मिरची पिकवून तब्बल ४० मेट्रिक टन उत्पादनची दुबईला केली निर्यात

ऑगस्ट 26, 2025
Next Post
Untitled 23

आता राज्यात नव्याने १० हजार गावांमध्ये हवामान केंद्राची उभारणी...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011