इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे येथे डॅाक्टराने तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डॅाक्टरांनी त्याच्या दोन साथीदारांसह हा हल्ला तरुण प्रितेश बाफणा याच्यावर केला आहे. या हल्ला प्रकरणाचा गुन्हा वाघोली येथील लोणीकंद पोलिस स्थानकात दाखल झाला आहे.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, जीवन रक्षक हॅास्पिटलचे डॅाक्टर विवेक गुप्ता आणि त्याचे दोन साथीदार गुंडानी कोयत्याने हा हल्ला केला. गुप्ता यांच्याकडून प्रितेश बाफणा याने व्याजाने पैसे घेतले होते. ते पैसे वेळत न दिल्याने हा हल्ला करण्यात आला.
पुण्यात कोयता गॅगची चर्चा थेट विधीमंडळाच झाली. त्यानंतर पोलिसांनी कडक अॅक्शन घेणे सुरु केले आहे. अशात डॅाक्टराने कोयत्याने हल्ला केल्याची घटना धक्कादायक आहे.