इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
एकीकडे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने अजित पवार यांना त्यांच्या बालेकिल्ला असलेल्या पिंपरी- चिंचवडमध्ये मोठा धक्का दिलेला असतांना आता छत्रपती संभाजी नगरमध्ये उध्दव ठाकरे भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे.
सात जुलैला भाजपचे अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. मंत्री अतुल सावे यांना हा मोठा धक्का आहे. या प्रवेशामुळे शिंदे गटातील आमदार संजय शिरसाठ यांची अडचण वाढणार आहे. या प्रवेश करणा-यांमध्ये उपमहापौर, स्थायी समितीच्या सभापती राहिलेल्या नगरसेकांचा समावेश आहे. यातील एका नगरसेवकांने गेल्या वेळी विधानसभा निवडणूक लढवलेली आहे.
या प्रवेश सोहळ्यात ७-८ माजी नगरसेवक, १ जिल्हा परिषद सदस्य, दोन पंचायत समिती सदस्य, १ तालुका अध्यक्ष, १ युवा मोर्चा अध्यक्ष, ५ मंडळ अध्यक्ष यांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.