बुधवार, ऑक्टोबर 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या शिबिरासाठी नाशिकच्या या खेळाडूंची निवड

जुलै 5, 2024 | 12:21 am
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक क्रिकेटसाठी आनंदाची बातमी. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन – एम सी ए – तर्फे, नव्या २०२४ -२५ हंगामासाठी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सत्यजित बच्छाव, मुर्तुझा ट्रंकवाला व साहिल पारख यांची महाराष्ट्र संघाच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या शिबिरासाठी निवड आली आहे.

डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छाव व सलामीचा फलंदाज मुर्तुझा ट्रंकवाला हे अनुभवी रणजीपटू आहेत. तर १९ वर्षांखालील उदयोन्मुख युवा खेळाडू डावखुरा सलामीवीर याची पहिल्यांदाच रणजी शिबिरासाठी निवड आली आहे. सत्यजित बच्छावने महाराष्ट्र संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी देखील पार पाडली आहे.

सत्यजित बच्छाव – महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक बळी घेत उत्कृष्ठ गोलंदाज सन्मान पर्पल कॅप चा मानकरी ठरला . सत्यजितने एकूण २५ बळी घेत वसंत रांजणे पर्पल कॅप चा बहुमान मिळवला.

सत्यजित बच्छावला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन – एम सी ए- चे २०२२ वर्षा साठीचे सर्वोत्कृष्ट – बेस्ट – क्रिकेटपटू चे पारितोषिक मिळाले आहे . २०१८-१९ या वर्षी सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी स्पर्धेत सत्यजित बच्छावने सर्वाधिक बळी मिळवत महाराष्ट्र संघाला अंतिम फेरीत नेण्यासाठी मोठा हातभार लावला होता व महाराष्ट्राने या स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते. आतापर्यंतच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सत्यजित हा महाराष्ट्र संघाचा महत्त्वाचा गोलंदाज झालेला आहे. या स्पर्धेतूनच आयपीएल स्पर्धेत खेळण्याची संधी उपलब्ध होते. मागील सहा-सात वर्षांपासून मुश्ताक अली स्पर्धेत सत्यजित सातत्याने उत्कृष्ठ कामगिरी करत असल्यानेच आय पी एल २०२२ च्या हंगामासाठी महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स – सी एस के – तर्फे संघाच्या शिबिरासाठी निवड झाली होती. सत्यजितला चेन्नई सुपर किंग्सने गोलंदाजी विशेषज्ञ म्हणुन संघाच्या शिबिरात खास निमंत्रित केले होते. गेल्या २०२२ च्या हंगामात मुश्ताक अली टी-ट्वेंटी स्पर्धेच्या काही सामन्यांत सत्यजितने महाराष्ट्राचे कर्णधारपद देखील भूषवले होते. जानेवारी २०१६ तील सर्विसेस विरुद्ध कटक येथे सुरू झालेल्या ,आतापर्यंतच्या टी-ट्वेंटी च्या कारकिर्दीत सत्यजितने ४६ सामन्यातील ४५ डावात एकूण ६२ बळी घेतले असून १८ धावात ४ बळी हि त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. मागच्या २०२२-२३ च्या हंगामात सत्यजितच्या नेतृत्वात त्याच्या अष्टपैलु खेळामुळे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत ( एम सी ए सिनियर इन्विटेशन लीग ), नाशिकने विजेतेपद पटकावले होते.

मुर्तुझा ट्रंकवाला, नाशिकचा सलामीचा फलंदाज याचे महाराष्ट्र संघातर्फे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय- च्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत २०२3-२4च्या हंगामात दमदार पुनरागमन झाले. संधी मिळताच विदर्भ संघा विरुद्ध दुसऱ्या डावात मुर्तुझा ट्रंकवालाने १२६ चेंडूत १५ चौकारांसह ८६ धावा केल्या.

२०१७ सालीच मुर्तुझाचा महाराष्ट्र रणजी संघामध्ये पहिल्यांदा समावेश झाला होता. त्यावेळी पहिल्याच रणजी सामन्यामध्ये मुर्तुझाने शतक झळकावले होते व पदार्पणातच शतक झळकवणारा नाशिकचा पहिला खेळाडू ठरला होता. मुर्तुझा २३ वर्षाखालील महाराष्ट्र संघाचाहि कर्णधार होता. मुर्तुझाने महाराष्ट्र संघातर्फे प्रथम श्रेणीच्या एकूण २२ सामन्यातील ३६ डावात ४ शतके व ५ अर्ध शतके यांसह आतापर्यंत एकंदर ११८१ धावा केल्या आहेत. मागील वर्षी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत ( एम सी ए सिनियर इन्विटेशन लीग ), नाशिकने पुन्हा ९ वर्षांनी विजेतेपद पटकावले. या वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत फलंदाजीत सलामीवीर मुर्तुझा ट्रंकवालाने पहिले स्थान पटकवताना ११ सामन्यातील १५ डावात ४ शतके व ६ अर्धशतकांसह तब्बल ९९८ धावा फटकावल्या. सर्वोच्च धावसंख्या होती १६७ . सरासरी ७६.७७, स्ट्राइक रेट ११३.२८. त्यात एकूण ३८ षटकार व १३८ चौकार .या स्पर्धेतील अंतिम सामन्यात मुर्तुझाने बहुमोल शतकी कामगिरी करत १०२ धावा केल्या होत्या. त्यानंतर चाचणी सामन्यात देखील त्याने शतक झळकवले होते.

साहिल पारख याची १९ वर्षांखालील वयोगटात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय तर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी – एन सी ए – च्या हाय परफॉरमन्स कॅम्प – उच्च कामगिरी साठीचे शिबिर – साठी निवड झाली आहे. २० जुन ते २० जुलै दरम्यान हे शिबिर एन सी ए, बेंगळुरू येथे होत आहे. यंदा २६ एप्रिल ते २२ मे दरम्यान माजी कसोटीपटू व्हि व्हि एस लक्ष्मण प्रमुख असलेल्या एन सी ए, बेंगळुरू तर्फे भारतभरातील उदयोन्मुख , युवा खेळाडूंसाठी झालेल्या शिबीरात साहिलची सलग दुसऱ्या वर्षी निवड झाली होती. त्यानंतर आयोजित १९ वर्षांखालील वयोगटातील बीसीसीआयच्या इंटर एन सी ए स्पर्धेत इंडिया बी कडून खेळताना एकदिवसीय सामन्यात साहिलने अतिशय आक्रमक व सातत्यपूर्ण धडाकेबाज फलंदाजी करत आहे व ४ डावात १६८ च्या सर्वाधिक स्ट्राइक रेट नी ९१.६७ च्या सरासरीने एकूण २७५ धावा कुटल्या आहेत.

या हंगामात इंदोर येथे झालेल्या बी सी सी आय च्या १९ वर्षांखालील विनू मंकड करंडक स्पर्धेत महाराष्ट्र संघाने बलाढ्य मुंबई संघावर ११५ धावांनी विजय मिळवत विजेतेपद मिळवले. बी सी सी आय च्या या विनू मंकड करंडक स्पर्धेत साहिल पारखने ९ डावांत २ शतके व एका अर्धशतकासह ३६६ धावा फटकावल्या. या स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर साहिलची १९ वर्षांखालील एक दिवसीय चॅलेंजर ट्रॉफीसाठी इंडिया डी संघात निवड झाली होती . बी सी सी आय ची सदर १९ वर्षांखालील एक दिवसीय चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धा ३ ते ९ नोव्हेंबेर दरम्यान गुवाहाटी येथे खेळवण्यात आली . त्याआधी १६ वर्षांखालील आमंत्रितांच्या साखळी ( इन्व्हिटेशन लीग ), स्पर्धेतील जोरदार कामगिरी मुळे १६ वर्षांखालील महाराष्ट्र संघाकडून खेळताना बी सी सी आय विजय मर्चंट ट्रॉफीतहि साहिलने आपल्या आक्रमक फलंदाजीचे प्रदर्शन केले होते.

सत्यजित बच्छाव, मुर्तुझा ट्रंकवाला व साहिल पारख यांच्या या निवडीबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सत्यजितचे अभिनंदन करून स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकमध्ये जिओ फायबरचे समाजकंटकांकडून नुकसान, ऑनलाइन सेवांचा बोजवारा…पोलिस स्थानकात तक्रार दाखल

Next Post

स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत प्रकल्प ९० टक्के पूर्ण…१० टक्के कामाला दिली ही मदतवाढ

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय… काढला हा शासनादेश… अशी मिळणार मदत…

ऑक्टोबर 21, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा दिवाळी पाडव्याचा दिवस… जाणून घ्या, बुधवार, २२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 21, 2025
diwali padva balipratipada
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा- असे आहे महत्त्व

ऑक्टोबर 21, 2025
Untitled 42
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीत या ११ गोष्टी लक्षात ठेवा… ज्योतिष शास्त्री प्रशांत चौधरी यांनी दिल्या या टीप्स…

ऑक्टोबर 21, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
मुख्य बातमी

बंपर दिवाळी भेट… एकाचवेळी ४७ महसूल अधिकाऱ्यांना बढती… बघा संपूर्ण यादी…

ऑक्टोबर 20, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा लक्ष्मीपूजनाचा दिवस… जाणून घ्या, मंगळवार, २१ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 20, 2025
rape
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शहरात महिला विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ… या तीन ठिकाणी गुन्हे दाखल…

ऑक्टोबर 20, 2025
Untitled 79
महत्त्वाच्या बातम्या

आज आहे लक्ष्मीपूजन! असे आहे मुहूर्त… अशी करा पूजा…

ऑक्टोबर 20, 2025
Next Post
Untitled 17

स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत प्रकल्प ९० टक्के पूर्ण…१० टक्के कामाला दिली ही मदतवाढ

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011