गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकमध्ये जिओ फायबरचे समाजकंटकांकडून नुकसान, ऑनलाइन सेवांचा बोजवारा…पोलिस स्थानकात तक्रार दाखल

by India Darpan
जुलै 5, 2024 | 12:19 am
in संमिश्र वार्ता
0
JIO1

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक शहरातील प्रल्हाद आर्केड, गणेश विहार येथील जिओ केबल काही अज्ञात समाजकंटकांकडून हेतुपुरस्पर कापुन नेटवर्कला अडथळा आणल्याचे प्रकार समोर आले असून यामुळे सर्व सामान्य नागरिक, विद्यार्थी आणि ऑनलाइन सेवा पुरवणाऱ्या घटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जाणूनबुजून काही अज्ञात प्रवृत्ती खोडकरपणे असे प्रकार केल्याने सर्वसामान्य नागरिक त्रासले आहेत. कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिस पुढील तपास करत आहेत. नेटवर्क ला अडथळा आणन्याचे प्रकार नाशिक शहर तसेच परिसरात केल्याने ऑनलाईन सेवा ठप्प झाल्याने सर्व सामान्य ग्राहक, विद्यार्थी यांची मात्र मोठी अड्चण झाली. कंपणीने कोट्यवधी रुपये गुंतवून उभारलेल्या नेटवर्कची नासधुस केल्याने नियमित रिचार्ज करत असलेल्या ग्राहकाना मनस्ताप सहन करावा लागला.

नुकत्याच आलेल्या टेलीकॉम पॉलिसीमध्ये टेलिकॉम ही अत्यावश्यक तसेच शासकीय सेवेत समाविष्ट केली असून या सेवेत अडथळा आणल्यास कडक कारवाईची तरतूद केली आहे. आरोपींकडून नाशिक शहरातील विविध भागात केबल कट करणे, नेटवर्क सामग्रीची नासधूस करणे, अत्यंत महाग अशी केबल चोरून नेणे असे समाजविघातक प्रकार करण्यात आले. ग्राहकांच्या तक्रारींची दाखल घेऊन जीओच्या फिल्ड इंजिनिअर्स कडून दिवस रात्र अथक परिश्रम करून नेटवर्क सुरळीत ठेवले गेले . दुरुस्ती करणाऱ्या कंपनीच्या नेटवर्क इंजिनिअर्सला धमकावले देखील जात आहे. कंपनीने या गंभीर प्रकारांची दखल घेऊन ग्राहकांना होणारा मनस्ताप टाळण्यासाठी तसेच समाजविघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी शेवटी तक्रार दाखल केली

एकीकडे सगळ्यांना उत्कृष्ट स्पीडसह नेटवर्क हवे आहे तर याच वेळी काही समाजविघातक घटक नेटवर्कची नासधूस करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये ग्राहक जीओला जबाबदार धरत असून वस्तुस्थिती समोर आणणे गरजेचे आहे. टॉवर आहेत परंतु नेटवर्क नसल्याची ओरड केली जाते. बऱ्याच ठिकाणी टॉवरची बॅटरी चोरून नेणें, डिझेल चोरी, केबल चोरून नेणे असे प्रकार देखील सतत घडत असून यावेळी स्थानिक ग्रामस्थ, प्रशासन, तसेच पोलिसांनी लक्ष घालण्याचे गरजेचे आहे. कोरोना काळात अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश असलेल्या टेलिकॉम कंपन्यांपुढे अशी अनेक आव्हाने असून तरीही सर्वाना सिमलेस नेटवर्क देण्यासाठी कंपनीचे कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत असतात. अशा प्रवृत्तींना आळा घालुन कंपनीला सहकार्य करावे अशी सर्वसामान्य ग्राहकांची आणि जनमानसाची भावना असल्याचे जीओकडून सांगण्यात आले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्राच्या समर्थ महाकवेने १७ वर्षांखालील गटातील ग्रीको-रोमन आशियाई कुस्ती स्पर्धेत जिंकले रौप्यपदक

Next Post

रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या शिबिरासाठी नाशिकच्या या खेळाडूंची निवड

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या शिबिरासाठी नाशिकच्या या खेळाडूंची निवड

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011