लासलगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथे सोमवारी संध्याकाळच्या सुमारास जमिनीच्या वादातून २९ वर्षीय कृष्णा उर्फ किशोर धोक्रट या तरुणावर भर चौकात धारदार शस्रने हल्ला करण्यात आला होता. दरम्यान आज त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी लासलगाव पोलिस्थानकात आज संताप व्यक्त केला.
या गुन्हयातील मास्टरमाइंड गुन्हेगार असलेल्या आरोपीला अटक करावी अशी मागणी लावून धरल्याने पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे. मात्र अटक केलेल्या आरोपीला आमच्या समोर आणा अशी मागणी केल्याने पोलीस व नातेवाईक यांच्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. नातेवाईकांनी पोलीस स्थानकात ठिय्या मांडला परिस्थिती चिघळू नये म्हणून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला..