इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी दिल्लीतील जीटीबी नगर येथील बांधकाम साईटवर गेले. तेथे त्यांनी कामगारांची भेट घेऊन त्यांच्या समस्या ऐकल्या. यावेळी ते म्हणाले की, हे कष्टकरी कामगार भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. त्यांचे जीवन समृध्द करणे आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करणे ही आपली जबाबदारी आहे.
याअगोदर राहुल गांधी यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांशी संवाद साधला आहे. एकदा तर त्यांनी रेल्वे स्टेशनवर जाऊन हमालांचा लाल गणवेश परिधान केला होता. तर हरियाणातील सोनीपतमधील मदिना गावात भाताची लागवड केली. त्यानंतर ट्रॅक्टर चालवून शेतात भाताची पेरणी केली. तर काहीवेळा ते गॅरेजमध्ये दिसले. एकदा तर ते ट्रकमधून प्रवास करतांना सगळ्यांनी बघितले. गेल्या काही दिवसात ते वेगवेगळ्या व्यवसायातील नागरिकांशी भेट घेऊन त्यांचे प्रश्न समजून घेत आहेत. त्यांचीशी ते सविस्तर चर्चाही करतात याअगोदर त्यांच्या अशा भेटी चर्चेत राहिल्या आहेत.
पण, आजची भेट त्यांची कामगारांची होती. त्यामुळे त्यांनी बांधकाम साईटवर भेट दिली.