इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मनमाड-मालेगाव राज्यमार्गावर पुणे-दोंडाईचा या बसचा कुंदलगाव शिवारात अपघात झाला. या अपघातात बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली.
बस चालकाने ब्रेक दाबल्याने बस रस्त्यावरून घसरल्याने ती पलटी झाली. बस मध्ये एकूण २६ प्रवासी होते तर ६ जण किरकोळ जखमी
सर्व रुग्णांवर मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. अन्य प्रवाशांना दुसऱ्या बसने पाठवण्यात आले. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही.