शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनची महापालिकेकडे मागणी
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नंदिनी नदीकिनारी स्मार्ट सिटीअंतर्गत ५५हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. विद्युत पुरवठा, मीटरसह संबंधित प्रलंबित कामे पूर्ण करून हे कॅमेरे कार्यान्वित करावेत, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने केली आहे. महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्यासह संबंधित विभागांना बुधवारी, ३ जुलै रोजी निवेदन देण्यात आले आहे.
सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांनी सतत दोन वर्षे पाठपुरावा केला. स्मार्ट सिटीने २३ ठिकाणी ५५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. ते कार्यान्वित करण्यासाठी विद्युत पुरवठा व मीटरच्या व्यवस्थेसह महापालिकेची प्रलंबित कामे पूर्ण करावीत, यासाठी स्मार्ट सिटीने महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र, याबाबत निर्णय झालेला नाही. कॅमेरे कार्यान्वित झाल्यास नंदिनी नदीमध्ये टाकली जाणारी घाण, कचरा, वाळू उपसा व येथील गुन्हेगारीला प्रतिबंध बसणार आहे. नंदिनीचे पर्यायाने पवित्र गोदावरी नदीचे प्रदूषण कमी होईल. स्वच्छ व सुंदर नाशिक संकल्पनेला बळ मिळेल. नंदिनी नदीच्या पूरस्थितीतही या कॅमेर्यांचा उपयोग होईल. त्यामुळे ते त्वरित कार्यान्वित करावे, अशी मागणी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, धवल खैरनार, संगीता देशमुख, विठ्ठलराव देवरे, बापूराव पाटील, बाळासाहेब देशमुख, दिलीप निकम, निलेश ठाकूर, मनोज वाणी, सतीश मणिआर, दिलीप दिवाणे, अशोक पाटील, बन्सीलाल पाटील, बाळासाहेब राऊतराय, आनंदराव तिडके, भारती देशमुख, प्रतिभा पाटील, वंदना पाटील, दीपक दुट्टे, प्रथमेश पाटील आदींसह रहिवाशांनी केली आहे.