इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक – महाराष्ट्र कंपनी स्पोर्ट्स असोसिएयशनच्या वतीने आणि इंडियन कंपनी स्पोर्ट्स फेडरेशनच्या मान्यतेने आणि मार्गदर्शनाखाली आणि लाख मराठा प्रतिस्थान आणि अस्मिता दर्शन महिला मंडळ यांच्या सहकार्याने नाशिकच्या यशवंत व्यायाम शाळा येथे ९ व्या राष्ट्रीय कंपनी स्पोर्ट्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धाला मोठ्या उत्साहात सुरवात झाली. या स्पर्धेत व्हॉलीबॉल आणि कबड्डी या दोन खेळांचा समावेश आहे. या स्पर्धेत दिल्ली, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, पंजाब, ओरिसा, मणीपुर, राजस्थान, गुजराथ, तेलंगणा, आसाम यां राज्यांचे संघ सहभागी झाले आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन इंडियन कंपनी स्पोर्ट्स फेडरेशनचे चेअरमन डॉ. एम. पी. सिघ, फेडरेशनचे कव्हेनरपी. के. पांडा, जेष्ठ माजी पोलिस निरीक्षक चंद्रकांत बनकर, अशोक दुधारे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती पुरस्कार प्राप्त आनंद खरे, अवीनाश खैरनार, राजू शिंदे, अशोक कदम, सुजीत काळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलतांना मा. पोलिस निरीक्षक चंद्रकांत बनकर यांनी सांगितले की, कामगारांसाठी या स्पर्धा असल्यामुळे खेळांचा फायदा कामगारांना आपल्या कामातील कार्यक्षमता वाढण्यास होतो. त्यामुळे हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे असे सांगून खेळाडुना शुभेच्या दिल्या.
या स्पर्धा प्रथम साखळी आणि त्यानंतर बाद पद्धतीने खेळविल्या जाणार आहेत. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे खेळाडूंची भारताच्या संघासाठी निवड केली जाणार आहे. हे निवड झेलेले संघ मेकशिको येथे ७ ते ११ डिसेंबर, २०२३ दरम्यान आयोजित होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतातर्फे सहभागी होतील.
आज उद्घाटनानंतर झालेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्यात पश्चिम बंगाल संघाने गुजराथ संघाचा २-० असा पराभव करून पहिला सामना जिंकून चांगली सुरवात केली. दुसऱ्या सामन्यात पंजाब संघाने दिल्ली संघाला चुरशीच्या लढतीत २-१ असे पराभूत करून विजयी सुरवात केली. पावसाची शंक्यता असल्यामूळे कबड्डीच्या स्पर्धा कबड्डी मॅटवर मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल, पंचवटी येथील बंदिस्त (Indoor) हॉलमध्ये आयोजित केल्या आहेत.
कबड्डी मध्ये यजमान महाराष्ट्राच्या संघाने चांगली सुरवात करून पहिल्या सामन्यात आंध्र प्रदेशवर २९-१६ असा विजय मिळवून सुंदर सुरवात केली. पश्चिम बंगाल संघानेही चांगला खेळ करून आपल्या पहिल्या सामन्यात तेलंगाना संघाला २४- २१ असा पराभव करून विजय मिळवला उद्या सकाळी दोन्हीही खेळांचे उपांत्य सामने खेळविले जातील आणि सायंकाळी अंतिम सामने खेळविले जातील. त्यानंतर विजेत्या संघांना पारितोषिके देवून सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत व्हॉलीबॉलचे पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच अमोघ गोरे, राज्य पंच अक्षय गामणे, मंगेश मंडले तर कबड्डीची पंच म्हणून प्रणव अहिरे, शरद पाटील, भारती जगताप चिन्मय देशपांडे, करिष्मा सोनार, ऐश्वर्या भोर, तृप्ती जाधव, अक्षदा धारांकर बंटी पाटील आदी काम बघत आहेत.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गणेश कड, दिपक निकम,अशोक कदम, शरद पाटील, अविनाश खैरनार, दिपक पाटील, राजू शिंदे, शशांक वझे, आनंद चकोर, जय शर्मा, अविनाश वाघ, चिन्मय देशपांडे, अविनाश ढोली, राजीव वाळके, भूषण भटाटे, ज्योती निकम, मनिषा काठे आदी परिश्रम घेत आहेत.