मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगाव शहरात एमपीएससीएल या खाजगी वितवितरण कंपनी मार्फत विज पुरवठा केला जातो. या कंपनी विरोधात नागरीकांच्या अनेक तक्रारी असून त्याकडे वीज कंपनीचे अधिकारी लक्ष देत नसल्याने मालेगाव समाजवादी पार्टी तर्फे दुपारी त्यांच्या कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.
शहरातील विविध भागातील विद्युत डीपी चार दिवसांपासून जळाल्या असून त्याबदलण्यात आलेल्या नसल्याने अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडीत झालेला आहे. याकडे कंपनीचे अधिकारी लक्ष देत नसल्याने समाजवादी पार्टीने कार्यालयात घुसून सर्व कर्मचा-यांना बाहेर काढत घोषणाबाजी करत आंदोलन केले.