इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नांदेडः स्कूल व्हॅनमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थिबरोबर चालकानेच अश्लील चाळे केले. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या दीड तासांत चालकाला अटक केली.
हा व्हिडीओ सध्या ‘सोशल मीडिया’वर चर्चेचा विषय ठरला आहे. स्कूल व्हॅनमध्ये हा घाणेरडा प्रकार सुरू असताना काही तरुणांनी आपल्या मोबाईलमध्ये तो रेकार्ड केला. मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आल्यानंतर काही तासांमध्ये तो व्हायरल झाला. नांदेड शहरातील कालव्याच्या रस्त्यावर अनेक नामांकित शाळा असून या रस्त्यावर एका मैदानावर ही स्कूल व्हॅन उभी होती. दूरवर निर्जनस्थळी उभ्या करण्यात आलेल्या या स्कूल व्हॅनबाबत एका दुचाकी चालकाला शंका आली. या तरुणाने आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डींग सुरू केले. त्या वेळी अल्पवयीन मुलगी त्या ड्रायव्हरच्या मांडीवर झोपली होती. आपला व्हिडिओ काढत असल्याचे समजताच ती उठली.
व्हिडिओ काढणाऱ्या तरुणाने चालकाला जाब विचारला. त्याचे नाव विचारल्यानंतर सुरुवातीला त्याने आपले नाव वेगळेच सांगितले. आडनाव विचारता आणखी वेगळेच सांगितले.निर्जनस्थळी मुलीसोबत काय करतो, असे विचारल्यानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. ही मुलगी ही १६ ते १८ वर्षांची असावी. दरम्यान, या प्रकरणाला वेगळे वळण मिळून तणाव वाढू नये यासंदर्भात पोलिस विशेष काळजी घेत आहेत.