इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ऑक्टोबर 2023 मध्ये एकूण वस्तू आणि सेवा कर, जीएसटी महसूल संकलन 1,72,003 कोटी रुपये झाले आहे, ज्यापैकी 30,062 कोटी रुपये सीजीएसटी, 38,171 कोटी रुपये एसजीएसटी, 91,315 कोटी रुपये ( 42,127 कोटी रुपये आयात मालावरील महसूल संकलनासह) आयजीएसटी आणि 12,456 कोटी रुपये (आयात मालावरील 1,294 कोटी रुपयांच्या संकलनासह) उपकराद्वारे मिळाले आहेत.
सरकारने आयजीएसटीतून सीजीएसटी ला 42,873 कोटी रुपये आणि एसजीएसटी ला 36,614 कोटी रुपये अदा केले आहेत. नियमित जुळवाजुळवीनंतर (सेटलमेंटनंतर) ऑक्टोबर 2023 मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल सीजीएसटी साठी 72,934 कोटी रुपये आणि एसजीएसटी साठी 74,785 कोटी रुपये आहे.
ऑक्टोबर 2023 मध्ये सकल जीएसटी महसूल मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत 13% अधिक आहे. या महिन्यादरम्यान, देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) महसूल देखील गेल्या वर्षी याच महिन्यात या स्रोतांमधून मिळालेल्या महसुलापेक्षा 13% जास्त आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये सरासरी सकल मासिक जीएसटी संकलन आजमितीस 1.66 लाख कोटी रुपये असून मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत 11% अधिक आहे.
खालील तक्ता चालू वर्षातील मासिक सकल जीएसटी महसुलातील कल दर्शवितो. खालील तक्त्यामध्ये ऑक्टोबर 2023 पर्यंतच्या प्रत्येक राज्याच्या जीएसटीच्या सेटलमेंटनंतरच्या महसूलाची राज्यवार आकडेवारी दर्शविली आहे.