नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पायी पालखी सोहळ्यातील दिंडीप्रमुख, नाशिक जिल्ह्यातील ज्येष्ठ किर्तनकर ह.भ.प. रामनाथ महाराज शिलापूरकर यांचे निधन झाले. आज पहाटे नगर येथे पालखी सोहळ्यातच तीव्र हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले.
या घटनेनंतर मंत्री छगन भुजबळ यांनी संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे. त्यांनी म्हटले की, निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, त्यांच्या कुटुंबियांच्या व समस्त वारकरी बांधवांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, तसेच दिवंगत आत्म्यास सद्गती लाभो, हीच प्रार्थना!