इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील फुलरई या गावात भोलेबाबाच्या सत्संगात चेंगराचेंगरीची घटना घडली. या दुर्घटनेत २७ भाविकांचा मृत्यू झाला तर १०० हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वांना सार्वजनिक आरोग्य केंद्रात अनेकांना भरती करण्यात आले आहे. तर या दुर्घटनेतील गंभीर भाविकांना जिल्ह्याच्या ठिकाणी उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या घटनेत मयताचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
या दुर्घटनेत काही जण पायाखाली आले तर काही जणांचा गुदमरुन मृत्यू झाला. या घटनेबाबत एटा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॅा. उमेश कुमार त्रिपाठी म्हणाले, आतापर्यंत २७ मृतदेह पोस्टमार्टम हाऊसमध्ये आले आहेत, ज्यात २५ महिला आणि २ पुरुष आहेत. अनेक जखमींनाही दाखल करण्यात आले आहे. तपासानंतर अधिक तपशील समोर येईल अशी माहिती दिली.
या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे.