लासलगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नवी दिल्ली कृषी विभागाकडून कांदा खरेदीच्या माहितीसाठी केंद्रीय पथक लासलगावला आज दाखल झाले आहे. या पथकाने लासलगाव बाजार समितीत कांदा लिलावाची माहिती घेतली. त्यानंतर शेतकऱ्यांशी चर्चा केली.
नाफेड एनसीसीएफच्या कांदा खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा शेतकरी संघटनेंचा आरोप आहे. त्यामुळे हे पथक आल्याची चर्चा होती. पण, आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी माहिती घेण्यासाठी आलो आहे. नाफेड शिफ्टच्या कांदा खरेदीच्या चौकशीसाठी आलो नसल्याची पथकातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली.