मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील सावित्रीबाई फुले भाजी मार्केटचे काम गेल्या अनेक वर्षां पासून अर्धवट अवस्थेत असल्याने हे काम त्वरीत सुरु करुन भाजी विक्रेत्यांना दिलासा द्यावा या मागणीसाठी आरपीआयतर्फे एक दिवशीय लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. भाजी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष गंगादादा त्रिभुवन यांनी भाजी मार्केटच्या चौथ्या मजल्यावरील टेरेस वर जात अर्धनग्न होत नपाने त्वरीत या इमारतीचे काम सुरु करावे अशी मागणी करत घोषणाबाजी केली.
गेल्या २५ वर्षा पासून ही इमारत अर्धवट अवस्थेत पडून असून त्याठिकाणचा वापर गैरकृत्यासाठी केला जातो तर तेथे मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरलेले असल्याने रोगराई पसरत असून त्याची स्वच्छता करुन इमारतीचे अर्धवट काम पुर्ण करावे व भाजी विक्रेत्यांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.