नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोड येथे लॉज व्यवस्थापकाला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन टोळक्याने दहा हजार रूपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहन सुभाष जाधव,दाऊद शेख,सोनू व गणी अशी खंडणीखोरांची नावे आहेत. याबाबत ज्ञानेश्वर मल्लू पवार (२७ रा.पाथर्डी फाटा) या युवकाने फिर्याद दाखल केली आहे. ज्ञानेश्वर पवार नाशिकरोड येथील नॅशनल लॉज येथे व्यवस्थापक पदावर कार्यरत असून सोमवारी (दि.१) सायंकाळच्या सुमारास तो आपली सेवा बजावत असतांना ही घटना घडली.
संशयित रोहन जाधव याने लॉज मध्ये येवून दहा हजार रूपयांच्या खंडणीची मागणी केली. यावेळी त्याने खाली पोरांकडे कोयता असून त्यांना बोलावू का ? तुझा गेम करून टाकून पुण्याला पळून जाऊ यावेळी त्याने यापूर्वीही खून केला असून मला काही फरक पडत नाही असा दम दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.