मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आले. काल सभागृहात केलेल्या शिवीगाळ प्रकरणी ही कारवाई सभापती निलम गो-हे यांनी केली आहे.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरुन विधानसभेत काल राडा झाला. त्यात अंबादास दानवेंनी आपल्याकडे हात दाखवणा-या भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली. त्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आज विधान भवनाच्या पाय-यावर आंदोलन केले. अंबादास दानवे यांनी माफी मागावी, त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली. तर चंद्रकात पाचील यांनी दानवेंच्या निलंबनाची मागणी केली. त्यानंतर ही कारवाई झाली.