नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात काल मुसळधार पावसानंतर महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहे.
या तक्रारीनंतर महावितरणने विद्युत पुरवठा खंडीत होण्याचे कारण सांगितले आहे, महावितरणच्या ११ केव्ही गंजमाळ विद्युत वाहिनीवर मोठे झाड पडल्यामुळे ४ विद्युत खांब कोसळले आहेत. त्यामुळे सारडा सर्कल ते मुंबई नाका या परिसरातील २० रोहित्र बंद झाले असून जवळपास १, ५०० ग्राहकांचा वीज पुरवठा बंद झाला आहे. या ठिकाणी महावितरणचे अभियंते व जनमित्र कार्यरत असून विद्युत खांब उभारणीचे काम सुरू असून यासोबतच वीज पुरवठा इतर वाहिनीवरून पर्यायी मार्गाने सुरू करण्याचे काम चालू आहे. ५ रोहीत्रांचा वीज पुरवठा आज सायंकाळपर्यंत सुरळीत करण्यात येईल.