इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणानंतर सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून घोषणा दिल्या. या विरोधात आज विधानभवन परिसरात महाविकास आघाडीने आंदोलन केले.
घाबरले रे घाबरले भाजप वाले घाबरले, मनुवाद हटाओ संविधान बचाओ अशा घोषणा देत महाविकास आघाडीने सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.
राहुल गांधींच्या विरोधात लोकसभेतील भाषण नंतर खोटं नेरेटीव्ह सेट करण्यात आले. त्याला विरोध म्हणून आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत सरकार विरोधात निदर्शने केली.