नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी व्दिवार्षिक निवडणुकीत किशोर दराडे (शिवसेना) यांना तिसऱ्या फेरी अखेर २६ हजार ४७६ मते मिळाली होती. जिंकून येण्यासाठी ३१ हजार ५७६ इतक्या मतांचा निश्चित केलेला कोटा १९ व्या फेरी अखेर उमेदवार किशोर दराडे यांनी पूर्ण करून सर्वाधिक पसंतीक्रमाची ५ हजार ६० मते मिळवून ३२ हजार ३०९ मतांनी नाशिक शिक्षक मतदार संघातून निवडून आले, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी जाहीर केले.
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण ३० टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण ६४ हजार ८५३ मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी ६३ हजार १५१ मते वैध ठरली तर १ हजार ७०२ मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी ३१ हजार ५७६ इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता.
या निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती मते पडली याचे आकडे आता समोर आले आहे.