इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कोकण पदवीधरमध्ये भाजपचे निरंजन डावखरे यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करत ७२ हजार ११४ मतांनी विजय मिळवला. डावखरे यांना १ लाख ७१९ तर काँग्रेसचे उमेदवार रमेश किर यांना २८ हजार ६०५ मते पडली. मुंबईत भाजपला धक्का बसला असला तरी कोकण मतदार संघात मात्र यश मिळाले.
विधान परिषदेच्या ४ जागापैकी २ जागेवर ठाकरे गटाने बाजी मारली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब तर शिक्षक मतदार संघात जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर यांचा विजय झाला. परब यांना ४४ हजार ७८४ तर भाजपचे किरण शेलार यांना १८ हजार ७७२ मते मिळाली. २६ हजार २६ मतांनी परब यांनी हा विजय मिळवला. तर शिक्षक मतदार संघात जगन्नाथ अभ्यंकर यांनी ४ हजार ८३ मतांनी विजय मिळवला. या ठिकाणी शिक्षक भारतीचे उमेदवार यांच्यात अभ्यंकर यांची लढत होती.
भाजपने या निवडणुकीत जोरदार प्रचार करत ठाकरे गटाला शह देण्याचा प्रयत्न केला. पण, यात ठाकरे गटाला यश मिळाले. लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाने पुन्हा भाजपला मोठा धक्का दिला आहे. पण, कोकण पदवीधरमध्ये मात्र भाजपचे निरंजन डावखरे यांनी काँग्रेसचे उमेदवार रमेश किर यांना पराभव करत विजय मिळवला तर शिवसेना शिंदे गटाचे नाशिक येथील शिक्षक मतदार संघाचे उमेदवार किशोर दराडे यांचा विजय जवळपास निश्चित होता.