नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राहुरी येथील तहसील कार्यालयातील महसूल सहायक सुनील भवर यांना १५०० रुपयाची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. त्यांच्याविरुद्ध राहुरी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत एसीबीने सांगितले की, यातील तक्रारदार यांची मौजे रामपूर तालुका राहुरी येथे गट क्रमांक 372/2 क्षेत्र 60 आर इतकी शेत जमीन असून त्यापैकी 30 आर क्षेत्राचे कब्जेदार सदरी महाराष्ट्र सरकारचे नाव आहे. सदरचे नाव हे कमी करवायचे राहिले असल्यामुळे तसे पत्र तलाठी रामपूर यांना देण्यासाठी महसूल सहायक सुनील भवर यांनी तक्रारदार यांचे कडे दोन हजार रुपयाची लाचेची मागणी करून तडजोडअंती १५०० रुपये लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली व सदरची लाच रक्कम पंचासमक्ष तहसील कार्यालय राहुरी येथे स्वीकारल्याने त्यांच्याविरुद्ध राहुरी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
*यशस्वी सापळा कारवाई
*युनिट -*अहमदनगर.
*तक्रारदार-* पुरुष,वय- 50 वर्ष
*आलोसे- श्री सुनील भागवत भवर, वय-46 वर्ष, पद- महसूल सहायक ,वर्ग-3,
नेमणूक- शासकीय वसुली विभाग, तहसील कार्यालय राहुरी, ता. राहुरी,जि.अहमदनगर
रा. आशीर्वाद बंगला शेडगे मळा श्रीरामपूर ता श्रीरामपूर,जि. अहमदनगर
*लाचेची मागणी- दि.01/07/2024 2000
-तडजोड अंती- 1500/- रु.
– लाच स्वीकारली – दि.01/07/2024
*लाचेचे कारण- यातील तक्रारदार यांची मौजे रामपूर तालुका राहुरी येथे गट क्रमांक 372/2 क्षेत्र 60 आर इतकी शेत जमीन असून त्यापैकी 30 आर क्षेत्राचे कब्जेदार सदरी महाराष्ट्र सरकारचे नाव आहे सदरचे नाव हे कमी करवायचे राहिले असल्यामुळे तसे पत्र तलाठी रामपूर यांना देण्यासाठी आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचे कडे 2000/- रू लाचेची मागणी करून तडजोडअंती 1500/- रु. लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली व सदरची लाच रक्कम पंचासमक्ष तहसील कार्यालय राहुरी येथे स्वीकारल्याने त्यांच्याविरुद्ध राहुरी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- सापळा अधिकारी – श्रीमती छाया देवरे, पोलीस निरीक्षक, लाप्रवी ,अहमदनगर*
पर्यवेक्षण अधिकारी – श्री.प्रवीण लोखंडे पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. अहमदनगर. मो.नं.7972547202
सापळा पथक* 1)पो ना चंद्रकांत काळे 2) पोशि सचिन सुद्रुक 3) चालक पोलीस अंमलदार दशरथ लाड