नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या अंतिम फेरीचे आकडे समोर आले असून त्यात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आमदार किशोर दराडे यांनी ९१०४ मतांनी आघाडीवर आहे. या दुस-या फेरीत किशोर दराडे – २६४७६ यांना, विवेक कोल्हे -१७३३२, संदीप गुळवे – १६२८० मते मिळाली आहे. एकुण वेध ६४ हजार ८५३ मतांजी मतमोजणी झाली आहे. अवैध मते वगळून कोटा ३१५०० मतांचा कोटा निश्चित करण्यात आल्यामुळे आता दुस-या मतांच्या पसंतीवर उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. या मतमोजणीला रात्री उशीर होणार आहे.
नाशिक विभाग विधानपरिषद शिक्षक मतदारसंघ निवडणूक अपडेट 2024 – 25
एकूण मतदान – 64 हजार 853
=========================
➡️ किशोर भिकाजी दराडे : 26476
➡️ अँङ गुळवे संदीप गोपाळराव (पाटील) : -16280
➡️ ॲड महेंद्र मधुकर भावसार :131
➡️ कोल्हे विवेक बिपिनदादा: 17372
➡️ भागवत धोंडीबा गायकवाड : 9
➡️ अनिल शांताराम तेजा : 7
➡️ अमृतराव उर्फ आप्पासाहेब रामराव शिंदे : 259
➡️ इरफान मो इसहाक : -17
➡️कचरे भाऊसाहेब नारायण :1195
➡️ कोल्हे सागरदादा रविंद्र :66
➡️ कोल्हे संदीप वसंतदादा : 74
➡️ गव्हारे गजानन पंडीत : 151
➡️ गुरुळे संदिप वामनराव : 152
➡️ झगडे सचिन रमेश :107
➡️ दिलीप काशिनाथ डोंगरे: 78
➡️ आर.डी.निकम : 552
➡️ पै.डॉ.पानसरे छगन भीकाजी :10
➡️ बोठे रणजित नानासाहेब: 0
➡️ महेश भिका शिरुडे : 15
➡️ रतन राजलदास चावला : 68
➡️ संदीप गुळवे पाटील : 132
➡️ वैध मते : 63151
➡️ अवैध मते : 1702
मतपत्रिका जास्त
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज केंद्रीय वखार महामंडळ, गोदाम अंबड येथे सकाळी ८ वाजता सुरु झाली. या मतमोजणीत चोपडा येथील २२ क्रमांकाच्या मतदान केंद्रात ९३५ मतदान झाल्याची नोंद होती. मात्र या ठिकाणी मतपेटीत ९३८ मतपत्रिका आढळून आल्या. नाशिक जिल्ह्यातील येवला व निफाड मतदान केंद्राच्या मतपेटीत एक – एक मतपत्रिका जास्त आढळून आली. यावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला. या पाच मतपत्रिका तूर्त बाजूला ठेवण्यात आल्या आहे. जास्त मतपत्रिका आढळल्यामुळे काही काळ गोंधळ होता.