मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांनी सरकारी नोकर भरती बाबत माहिती दिली. ते म्हणाले की,
आतापर्यंत ५७ हजार ४५२ नियुक्ती आदेश दिले आहे. १९ हजार ८५३ नियुक्ती आदेश लवकरच देण्यात येणार आहेत. त्यामुळे ७७ हजार ३०५ नोकर नोकर भरती पूर्ण होईल.
७५ हजार सरकारी नोकरभरती करण्याचे आश्वासन आम्ही दिले होते. ते पूर्ण केले आहे. याशिवाय आणखी ३१ हजार २०१ पदांसाठी कारवाई सुरू आहे. त्यामुळे सरकारी नोकरभरती ही १ लाखांच्या वर जाणार आहे. एकही घोटाळा होऊ न देता ही प्रक्रिया आम्ही पूर्ण केली आहे. हा महाराष्ट्रातील नाही तर देशातील विक्रम आहे.