चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कांदा प्रश्नी कायम स्वरूपी तोडगा काढावा या मागणीसाठी नाशिकच्या चांदवडमध्ये संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी दिनाचे औचित्य साधत डॉ.श्याम पगार यांच्या नेतृत्वाखाली कांदा क्रांती आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे.
शासनाला जाग आणण्यासाठी चार दिवसांचे अन्न त्याग लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादक शेतकरी सहभागी झाले. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कांद्याला उत्पादन खर्चाच्या आधारित स्थिर हमी भाव द्यावा अन्यथा, निर्यातबंदी उठवावी आदींसह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.