इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय जनता पक्षाकडून विधान परिषदेसाठीची पाच नावे जाहीर केली असून त्यात पंकजा मुंडे, डॉ.परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांना संधी दिली आहे. एक परिपत्रक काढत या पाच नेत्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
याअगोदर भाजपने १० नावांची यादी पाठवली होती. पण, त्यात या पाज जणांना संधी मिळाली आहे. राज्यातील विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होणार आहे. विधान परिषदेच्या एका उमेदवारासाठी २३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये ५ जागा भाजप, २ शिंदेसेना तर २ जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळणार आहे.