इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवीन संसदेच्या प्रवेशव्दाराजवळ विरोधी पक्षांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शन करत सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.
यावेळी मोदी सरकारच्या राजकीय सूडबुद्धीसाठी तपास यंत्रणांच्या उघड गैरवापराचा निषेध केला. त्याचप्रमाणे लोकशाहीला कमजोर करणारी ही धोकादायक प्रवृत्ती बंद करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
सोमवारी संसदेचे अधिवेशन सुरु होत असतांना विरोधी पक्ष एकत्र आले. त्यानंतर त्यांनी हे निदर्शने केली. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.