इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोणावळाः घरात लग्न होते, कार्यक्रम आटोपल्यावर लग्नाचा थकवा घालवण्यासाठी पुण्यातील हडपसर भागातील खान आणि अन्सारी कुटुंबातील १८ सदस्य लोणावळा धरणाच्या पाठीमागे असणाऱ्या भुशी धरणावर वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी गेले होते. त्यावेळेस पाच जण वाहून गेले.
साहिस्ता लियाकत अन्सारी (वय ३६), अमिमा सलमान उर्फ आदिल अन्सारी (वय १३), उमेरा सलमान उर्फ आदिल अन्सारी (वय ८) हे वाहून गेले असून या घटनेतील तिघांचे मृतदेह सापडले आहेत. अदनान अन्सारी (वय ४), मारिया अन्सारी (वय ९) या दोघांचा शोध सुरू आहे.
भुशी धरण सध्या ‘ओव्हर फ्लो’ झाले आहे. रविवारी अन्सारी परिवार भुशी धरणावर पर्यटनासाठी आले होते. जंगलातून येणाऱ्या धबधब्यावर अन्सारी परिवार पाण्याचा आनंद घेत असताना धबधब्यात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. त्यात दहा जण अडकले होते. त्यापैकी पाच जणांना बाहेर काढण्यात यश आले; परंतु इतर पाच जण प्रवाहात वाहून गेले.