इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने आता भाजप सरकार जेथे आहे तेथील भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड करायची रणनिती आखली आहे. त्यामुळे रोज वेगवेगळ्या ठिकाणचे प्रकरण समोर आणण्याचे काम केले जाते.
आता काँग्रेसने सोशल मीडिायावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात म्हटले आहे की, हरियाणात भाजप सरकारने नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावला आहे. यामध्ये पावसाळ्यात रस्ता तयार होतो. नरेंद्र मोदी यांच्या नावावर या तंत्रज्ञानाचे पेटंट घेण्यात येणार आहे. तंत्रज्ञानाचे नाव असेल – पावसात रस्ते बांधा, भ्रष्टाचारातून पैसे कमवा.