इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
T20 विश्वचषक २०२४ जिंकल्याबद्दल भारतीय संघाला बीसीसीआयने १२५ कोटी रुपयाचे बक्षीस जाहीर केले आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ही घोषणा केली. तब्बल १७ वर्षांनी भारतीय संघाने ही कामगिरी केली. यामुळे देशभर उत्साह असतांना बीसीसीआयने ही मोठी घोषणा केली.
जय शहा यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, ICC पुरुष T20 विश्वचषक २०२४ जिंकल्याबद्दल टीम इंडियासाठी125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर करताना मला आनंद होत आहे. संपूर्ण स्पर्धेत संघाने अपवादात्मक प्रतिभा, दृढनिश्चय आणि खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन केले आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचे अभिनंदन!
टीम इंडियाला या विश्वचषकात अगोदरच २० कोटी ३६ मिळाले आहे. त्यात इतरही रक्कम वेगळी आहे. आता त्यात बीसीसीआयच्या रक्कमेची भर पडणार आहे.