इंडिाय दर्पण ऑनलाईन डेस्क
पाकिस्तानातील बलुचिस्तानच्या मस्तुंग येथे शुक्रवारी झालेल्या आत्मघाती बॅाम्बस्फोटात ५२ जणांचा मृत्यू झाला, तर १३० जण जखमी झाले. मृतांमध्ये एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीसाठी लोक जमत असताना हा हल्ला झाला.
शहीद नवाब घोस बख्श रायसानी मेमोरियल हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सईद मिरवानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत २८ मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले आहेत, तर २२ मृतदेह मस्तुंग जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहेत. उपमहानिरीक्षक (डीआयजी) मुनीर अहमद यांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितले की, आत्मघाती बॉम्बरने पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) यांच्या वाहनाजवळ स्फोट घडवून आणला. हा स्फोट एका मशिदीजवळ झाला जिथे लोक ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्तच्या मिरवणुकीसाठी जमले होते.
जिओ न्यूजच्या माहितीनुसार, या हल्ल्यात डीएसपी नवाज गिश्कोरी यांचा देखील मृत्यू झाला आहे. बलुचिस्तानचे काळजीवाहू माहिती मंत्री जान अचकझाई यांनी सांगितले की, सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गरज पडल्यास जखमींना कराचीलाही हलवण्यात येईल. जखमींच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी सरकार घेईल.