इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरातील धबधब्यामधून एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना घडली. आतापर्यंत दोन जणांचे मृतदेह बाहरे काढण्यात आले असून तीघांचा शोध सुरु आहे. या पाच जणांमध्ये लहान मुलं, महिलांचा समावेश आहे.
डॅमच्या मागील डोंगरातील धबधब्यात हे कुटुंब गेले होते. हा धबधबा रेल्वे वॅाटर म्हणून ओळखला जातो. या धबधब्यांचे पाणी भुशी धरणात येते. याचा ठिकाणी ही घटना घडली.
पावसाळा सुरु झाल्यानंतर भुशी धरणात आता मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली. गेल्या काही दिवसात या गर्दीमुळे प्रशासनही सज्ज झाले आहे. तरी सुध्दा ही मोठी घटना घडली.