लासलगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गावठी कट्टे विक्री करण्याच्या उद्देशाने पुणे येथून आलेल्या दोन तरुणांना नाशिक जिल्ह्यातील लासलगाव पोलिसांनी आज पहाटेच्या सुमारास सिनेस्टाईल पाठलाग करत ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३ गावठी कट्टे व ९ जिवंत काडतुसे व मोटरसायल असा १ लाख ३८ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पहाटेच्या सुमारास हे दोघे तरुण लासलगाव मधून जात असताना पोलिसांनी त्यांना हटकले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना संशय आल्याने पोलिसांच्या पथकाने त्यांचा पाठलाग करत त्यांना विंचूर चौफुली येथे ताब्यात घेत त्यांची तपासणी केली. त्यांच्या जवळ ३ गावठी कट्टे व काडतुसे सापडली, पोलिसांनी दोघा विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहे..