इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणेसह १६ नगरसेवकांनी काल शरद पवार यांची मोदी बागेत भेट घेतली. त्यामुळे अजित पवार गटाला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकानंतर शरद पवार गटाकडे इनकमिंग सुरु झाले आहे. बहुतांश अजित पवार गटाचे आमदाही पुन्हा शरद पवार यांच्या गटाकडे येणार असल्याची चर्चा आहे. त्यात आता अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यातच १६ नगरसेवक परतीच्या मार्गावर आहे.
या नगरसेवकांप्रमाणेच भोसरीचे माजी आमदार विलास लांडे सुध्दा शरद पवार गटाची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक घडामोडी होणार आहे. त्यात महायुती व महाविकास आघाडी हे दोन्ही एकत्रित निवडणुका लढवणार आहे. त्यात अनेक राजकीय अडचणी आता समोर येऊ लागल्या आहे.
लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला मिळालेले मोठे यश यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांच्या गटातून अनेक जण बाहेर पडण्याची चर्चा सुरु आहे.