इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिकरोडला दोन गटात झालेल्या राड्यात गोळीबार झाल्याने खळबळ निर्माण झाली आहे. रात्री विहितगाव परिसरातील मथुरा चौक येथे दोन गटात हा राडा झाला. यात एका गटाने थेट युवकावर गोळीबार केला. या गोळीबारात एकाच्या मांडीला गोळी लागली आहे. तर मारहाणीत चौघे जण जखमी झाले. या सर्व जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी गोळीबार आणि मारहाण प्रकरणात दोन आरोपींना अटक केलेली आहे. देवळाली गाव येथे राहणाऱ्या आकाश सोमनाथ पवार यांच्या मांडीला गोळी लागली आणि युवकांमध्ये जुन्या कुरापतीवरून आपापसात झालेल्या मारहाणीत चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
या सर्व घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत. गोळीबार आणि हल्ल्या प्रकरणी दोन आरोपींना उपनगर पोलिसांनी अटक केल्याची माहिती त्यांनी दिली.